… तर पुन्हा पुन्हा ‘एअर स्ट्राईक’ करू, संरक्षणमंत्र्यांचा पाकड्यांना इशारा

69

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

‘पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादी संघटनांविरोधात ठोस कारवाई करत तोपर्यंत हिंदुस्थान आपल्या सुरक्षेसाठी कठोर कारवाई करणारच. गरज पडल्यास पुन्हा पुन्हा ‘एअर स्ट्राईक’ करू’, असा इशारा देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिला. संरक्षणमंत्रालयाचा वार्षिक अहवाल सादर करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. तसेच पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांच्या लिस्टवर हिंदुस्थान असल्याचे सिद्ध झाले आहे, असेही अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.

संरक्षणमंत्रालयाच्या अहवालानुसार, जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनेने पुलवामा येथे केलेल्या हल्ल्यातून हे सिद्ध होते की पाकिस्तान दहशतवाद्यांच्या आडून हिंदुस्थानला टार्गेट करत आहे. दहशतवाद्यांच्या या हल्ल्याला हिंदुस्थानने बालाकोट येथील तळ उद्ध्वस्त करून चोख प्रत्युत्तर दिले. गरज पडल्यास भविष्यातही एअर स्ट्राईक करण्यास मागेपुढे पाहणार नसल्याचेही संरक्षणमंत्रालयाने आपल्या अहवालात म्हटले आहे.

तसेच पाकिस्तानी सैन्य जम्मू-कश्मीर सीमारेषेवर गोळीबाराच्या आडून सातत्याने दहशतवाद्यांनी हिंदुस्थानात घुसखोरी करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. हिंदुस्थानी लष्कर याला चोख उत्तर देत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादी घोषित केलेल्या दहशतवाद्यांविरोधात आणि त्यांच्या संघटनेविरोधात कारवाई करण्याल पाकिस्तान हात आखडता घेत आहे. याच संघटना नंतर शेजारील राष्ट्रांसाठी उपद्व्यापी ठरतात, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

चिन्याच्या घुसखोरीत घट
गेल्या काही वर्षात सीमारेषेवर हिंदुस्थान आणि चिनी सैन्य आमनेसामने आले होते. चिनी सैन्याच्या घुसखोरीतमुळे तणाव निर्माण झाला होता. 28 ऑगस्ट, 2017 रोजी डोकलाम येथे दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर उभे ठाकले होते. परंतु त्यानंतर चिनी सैन्याच्या घुसखोरीत घट आली असून हिंदुस्थानी जवान डोळ्यात तेल घालून सीमारेषेवर चिनी सैन्यांच्या हालचाली टीपत आहे, असे संरक्षणमंत्रालयाने अहवालात म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या