उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये भाजप कार्यकर्त्याची गोळ्या घालून हत्या; मतदान केंद्राजवळ आढळला मृतदेह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये भाजप कार्यकर्त्यांची गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोरांनी मतदान केंद्रजवळ भाजप कार्यकर्त्यांची हत्या केली. त्यानंतर तिथेच मृतदेह टाकून ते फरार झाले. या हत्येमागील कारणाची माहिती मिळालेली नाही. हत्या झालेल्या भाजप कार्यकर्त्याचे नाव कृष्णा यादव आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपासाला सुरुवात केली आहे.

ही घटना हाथरसमधील सिकंदर राव विधानसभा क्षेत्रातील गौसगंज मोहल्ला भागात घडली आहे. जीएस हिंदू इंटर कॉलेजजवळ कृष्णाचे घर आहे. त्याच्या घराजवळच मतदान केंद्र आहे. तिथेच कृष्णाचा मृतदेह आढळला आहे. त्याच्या डोक्यात गोळी घालून त्याची हत्या करण्यात आली आहे. हत्येमागचे कारण आणि आरोपींबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनाम करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

पोलिसांनी घटनास्थळी शस्त्रे सापडली आहेत. भाजप कार्यकर्त्यांची मतदान केंद्राजवळच गोळी घालून हत्या करण्यात आल्याने परिसरात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात रविवारी तिसऱ्या टप्प्याचे मतदान होते. त्यादरम्यानच कृष्णा यांची हत्या करण्यात आली आहे.

अयोध्या जिल्ह्यातील गौसाईगंज विधानसभा क्षेत्रातील सपाचे उमेदवार अभय सिंह आणि भाजपचे उमेदवार आरती तिवारी यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली होती. दोन्ही गटांनी एकमेंकावर दगडफेक आणि गोळीबार केल्याचे आरोप केले आहेत. तसेत 15 फेब्रवारीला रहमतुल्लाहरपूर गावात भाजपचे उमेदवार एसपी सिंह बघेल यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला होता. त्यातच आता मतदान केंद्रजवळ भाजप कार्यकर्त्याची हत्या करण्यात आल्याने परिसरात तणाव आहे.