उत्तर प्रदेश – मुस्लिम विद्यार्थ्याकडून हिंदू विद्यार्थ्याला चापट मारण्यास सांगितलं, शिक्षिकेला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
up-asmoli-police-station

मुस्लिम विद्यार्थ्याकडून वर्गात हिंदू सहविद्यार्थ्याला चापट मारण्यास सांगितल्याच्या आरोपावरून उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील एका शाळेतील शिक्षिकेला अटक करण्यात आली आणि तात्काळ शाळेतून निलंबित करण्यात आलं.

26 सप्टेंबर रोजी ही घटना घडली. इयत्ता 5 वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला साजिष्टा नावाच्या शिक्षिकेनं काही प्रश्न विचारले. त्यानंतर हा प्रकार घडला. कारण विद्यार्थ्याला शिक्षिकेच्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. तेव्हा शिक्षिकेनं एका मुस्लिम सहकारी विद्यार्थ्याला त्या हिंदू विद्यार्थ्यास चापट मारण्यास सांगितलं.

निराश हिंदू विद्यार्थ्यानं स्वतःला घरात कोंडून घेतल्याने हे प्रकरण उघडकीस आलं.

त्याच्या वडिलांनी विचारल्यावर, 11 वर्षीय मुलानं घडलेली घटना सांगितली आणि 27 सप्टेंबर रोजी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासानंतर, पोलिसांनी 28 सप्टेंबर रोजी शिक्षिकेला अटक केली, तर शाळेच्या अधिकाऱ्यांनी तिला निलंबित केलं.

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील एका खासगी शाळेतील शिक्षिकेवर तिने वर्गातील मुलांना त्यांच्या मुस्लिम वर्गमित्राला चापट मारण्याची सूचना दिल्यानं प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल झाल्यानंतर एक महिन्यानंतर ही घटना घडली आहे.