
जर मनाविरुद्ध तुमची भलत्याच ठिकाणी बदली झाली आणि लगेचच तुम्हांला तिथे रुजू होण्याचा आदेश वरिष्ठांनी दिला तर मनाची फार चरफड होते. फारतर आपण वरिष्ठांच्या नावाने बोटे मोडतो. पण उत्तर प्रदेशमध्ये एका पोलीस उपनिरिक्षकाने नको तिथे बदली झाल्याचा वेगळ्याच पद्धतीने विरोध दर्शवला आहे. तो चक्क 65 किलोमीटर धावत नवीन ठिकाणी रुजू होण्यास निघाला. पण वाटेतच चक्कर आल्याने त्याला थेट रुग्णालयात जावे लागले.
SI Vijay Pratap: I am being transferred due to the dictatorship of RI (Reserve Inspector of Police). I was asked by the SSP to stay back at Police Line but I am being transferred to Bitholi forcefully by the RI. You can call it my anger or unhappiness but I’ll run & go to Bitholi https://t.co/dgPR9R3lXd pic.twitter.com/LHNTRE62AS
— ANI UP (@ANINewsUP) November 15, 2019
विजय प्रताप असे या पोलीस उपनिरिक्षकाचे नाव असून काही दिवसांपूर्वीच त्याला बदलीचे पत्र देण्यात आले. सगळे सुरळीत सुरू असतानाच भलत्याच ठिकाणी बदली केल्याने विजय वरिष्ठांवर नाराज झाला. आधी तो पोलीस लाईन ठाण्यात कार्यरत होता. पण त्यांची बदली लांब असलेल्या बिथाउली येथे झाली. यामुळे विजय वैतागला होता. कुठलीही पूर्वसूचना न देता भलतीकडेच बदली करणाऱ्या वरिष्ठांच्या हुकुमशाहीविऱोधात आवाज उठवण्याचा त्याने निर्णय घेतला. आंदोलनाचे पारंपरिक मार्ग न वापरता त्याने निषेध नोंदवण्याचे ठरवले. त्याने बदलीच्या ठिकाणी धावत जाण्याचं निश्चित केलं. 65 किलोमीटर कुठेही न थांबता धावल्याने विजय यांना चक्कर आली ज्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
























































