
एका तरुणाला गाडीच्या खिडकीतून स्टंट करणं चांगलेच भारी पडले आहे. पोलिसांनी या स्टंट करणाऱ्या तरुणाला चांगलीच अद्दल घडवली आहे. पोलिसांनी या तरुणाला अटक केले असून त्याची गाडीही जप्त केली आहे. एवढेच नाही तर पोलिसांनी स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांना व्हिडीओ पोस्ट करत इशाराही दिला आहे,.
नोएडामध्ये महिंद्रा थार गाडी चालवताना स्टंटबाजी करणाऱ्या एकाला उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. यूपी पोलिसांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तरुण गाडी चालवताना त्याच्या कारच्या खिडकीबाहेर बेसबॉलची बॅट बॅट पकडून स्टंट करताना दिसत आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर, यूपी पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले आणि नोएडा सेक्टर 24 पोलीस ठाण्यात नेले.
पोलिसांनी केलेल्या ट्विटमधील व्हिडीओत एक तरुण महिंद्रा थार कार चालवताना दिसत आहे. यानंतर पोलिसांनी वाहन व चालकाची चौकशी केली आणि पकडल्यानंतर वाहन जप्त करण्यात आले. नंतर, चालक त्याच्या कृतीबद्दल माफी मागताना दिसत आहे. पुन्हा कधीही असा स्टंट करणार नसल्याचेही या तरुणाने सांगितले. यूपी पोलिसांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करताना ट्विट केले की, ‘तुम्ही रस्त्यावर स्टंटबाजी केली तर आम्ही कारवाई करू, कार जप्त करू, लॉकअपमध्ये टाकू.’
करोगे सड़क पे स्टंट तो हम करेंगे हंट।
गाड़ी होगी ज़ब्त होगे हवालात में शंट।#RoadSafety #DriveResponsibly pic.twitter.com/hC5viffIx3— UP POLICE (@Uppolice) May 29, 2022
सोशल मीडियावर हा व्हिडीओ टाकून पोलिसांनी स्टंटबाजी करणाऱ्यांना इशारा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नोएडाच्या रस्त्यावर लोक स्टंट व्हिडिओ करताना दिसत आहेत. नोएडा पोलीस अशा स्टंटबाजी करणाऱ्या लोकांना हुडकून ताब्यात घेत आहेत. यूपी पोलिसांनी शेअर केलेल्या या व्हिडिओवर लोकांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. तरुणांविरुद्ध केलेल्या कारवाईबद्दल नेटकऱ्यांनी यूपी पोलिसांचे कौतुक होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले की, ‘नोएडाच्या रस्त्यावर स्टंट करण्याची ही चांगली वेळ नाही. जर स्टंट केले तर नोएडा पोलीस नक्कीच अद्दल घडवतील.

























































