
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
मायक्रोसॉफ्टने ऑपरेटिंग सिस्टम विंडोज 7 बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मायक्रोसॉफ्टने सर्व यूजर्सना मेसेजद्वारे ‘विंडोज 7’ वरून ‘विंडोज 10’ अपडेट करण्यास सांगितले आहे.
मायक्रोसॉफ्टने यूजर्सना नोटीफिकेशन पाठविण्यास सुरुवात केली असून यात यापुढे विंडोज 7 चे अपडेट मिळणार नाही, असे म्हटले आहे. या नोटीफिकेशनमध्ये खाली ‘लर्न मोर’ असा ऑप्शन असून यावर क्लिक केल्यावर विंडोज 7 च्या वेबसाईटवरून संगणक अपडेट करण्याची सूचना केली आहे.
यूजर्ससाठी विंडोज अपडेट हा ऑप्शन उपलब्ध असेल. जर ऑटोमॅटिक अपडेट हा ऑप्शन निवडला असेल तर विंडोज 10 आपोआप डाऊनलोड आणि इन्स्टॉल होईल. यूजर्स सतत येणाऱया नोटीफिकेशनमुळे त्रासले असतील तर ‘डू नॉट रिमाइंड अगेन’ हा ऑप्शनही उपलब्ध आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार किंडोज 10 मायक्रोसॉफ्टसमोर 1 बिलियन इन्स्टॉलेशनचे लक्ष्य आहे. सध्या तरी ‘विंडोज 10’ सुमारे 800 मिलियन डिव्हाईसवर वापरले जात आहे.
- मायक्रोसॉफ्टने 22 जुलै 2009 मध्ये विंडोज 7 सुरू केले होते.
- यूजर्सना पाठविलेल्या नोटीफिकेशनमध्ये म्हटले आहे की, ‘दहा वर्षांच्या सेवेनंतर 14 जानेवारी 2020 हा विंडोज 7 चा शेवटचा दिवस असेल.
- यानंतर यूजर्स विंडोज 7 वापरत असतील तर त्यांना संगणकासाठी सिक्युरिटी अपडेट मिळणार नाही.
- यूजर्सनी लवकरात लवकर आपला डाटा आणि फाईल्स बॅकअप घेण्यासाठी या सूचना देण्यात आल्या आहेत.





























































