
केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) मार्फत भरल्या जाणाऱ्या विविध पदांच्या एकूण 462 जागांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे. या भरतीमध्ये असिस्टंट डायरेक्टर, डेप्युटी आर्किटेक्ट, असिस्टंट रजिस्ट्रार, मेडिकल फिजिसिस्ट, असिस्टंट एडिटर, असिस्टंट केमिस्ट, मेडिकल ऑफिसर, डेप्युटी सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर, व्हेटरिनरी असिस्टंट सर्जन या पदांसह विविध पदांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 जुलै 2025 आहे. भरतीसंबंधी सविस्तर माहिती https://upsconline.gov.in या वेबसाईटवर देण्यात आली आहे.



























































