
कुत्रा सतत भुंकत असतो त्यामुळे वैतागलेल्या एका तरुणाने त्या कुत्र्याची दगडाने ठेचून हत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्या तरुणाला अटक केली आहे. उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये ही घटना घडली आहे. या निर्घृण हत्येचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.
जॅकी असे त्या तरुणाचे नाव असून तो कानपूरमधील सरोज गल्लीत राहतो. त्याच्या घराजवळ अनेक भटके कुत्रे रस्त्यावर फिरत असतात. त्यातील एक कुत्रा हा सतत भुंकायचा. त्यामुळे जॅकी त्याच्यावर वैतागलेला होता. पहाटेच्या वेळी तो कुत्रा एका दुकानासमोर झोपलेला असताना जॅकी तिथे गेला व त्याने एक वीट त्या कुत्र्याच्या डोक्यात घातली. यावर तो थांबला नाही तो कुत्रा मरेपर्यंत कुत्र्याला ठेचत राहिला. त्यानंतर त्याने तिथून पळ काढला.
ज्या दुकानाच्या समोर हा प्रकार घडला. त्या दुकानाचा मालक धर्मेंद्र दुकान खोलायला आला तेव्हा त्याला दुकानासमोर कुत्रा मेलेल्या अवस्थेत दिला. त्याने तत्काळ त्याच्या दुकानाबाहेर सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. त्यात जॅकी कुत्र्याच्या डोक्यात वीट घालताना दिसला. त्यानंतर धर्मेंद्रने तत्काळ याबाबत पोलिसांना कळवले व त्याच्य़ाकडील फुटेज दाखवले. त्यानंतर पोलिसांनी शोध घेत जॅकीला अटक केली,




























































