प्रँक भोवला; ऊर्फीविरोधात गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई पोलिसांची बदनामी केल्याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी उर्फी जावेद विरोधात गुन्हा दाखल केला आहे.   उर्फिने प्रसिद्धीसाठी अंधेरी लोखंडवाला परिसरात एक रिल्स तयार केला. छोटे कपडे घातल्याने पोलिसांनी अटक केल्याचा तो रिल्स होता. त्या रिल्समुळे मुंबई पोलिसांबाबत सोशल मीडियावर चुकीचा संदेश गेला. उर्फीचा तो रिल्स चांगलाच व्हायरल झाला. तिला पोलिसांनी खरोखरच अटक केल्याचे सर्वांना वाटले. अपुरे कपडे परिधान केल्याने पोलिसांकडून अटक केली जाते असा संदेश गेल्याने मुंबई पोलिसांची बदनामी झाली. पोलिसांची बदनामी केल्या प्रकरणी उर्फी आणि अन्य चौघांविरोधात  ओशिवरा पोलिसांनी आज रात्री उशिरा गुन्हा नोंद केला. लवकरच पोलीस उर्फी आणि तिच्या सोबत असलेल्या चार जणांना चौकशीसाठी बोलवले जाणार आहे.