‘दीदी, पूर्ण कपडे घाल’, उर्फी जावेदला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेद सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. सोशल मीडियावर उर्फीच्या फॅन्स आणि फॉलोअर्समध्ये दिवसागणित वाढ होताना दिसत आहे. ती नेहमीच आपल्या विचित्र पेहराव्यामुळे ट्रोल्सच्या निशाण्यावर असते. आता देखील नेटकऱ्यांनी तिच्या एका व्हिडीओवरून तिला ट्रोल केलं आहे. या व्हिडिओत उर्फी एका इंग्रजी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

उर्फीचा व्हिडीओ व्हायरल

उर्फीने इंस्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ती पाठमोरी उभी राहून डान्स करताना दिसत आहे. तिने या व्हिडीओत बॅकलेस टॉप परिधान केला आहे. यावरूनच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. हा व्हिडीओ पाहून एका युजरने लिहिलं आहे की, ”दीदी, पूर्ण कपडे घाल.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Urrfii (@urf7i)

याआधी उर्फीने इंस्टाग्रामवर ब्लू बिकिनीत आपले फोटो शेअर केले होते. ज्यात तिने आपल्या कमरेवर एक स्कार्फ बांधलेले होता. बिकिनी परिधान करून उर्फी समुद्रकिनारी मोमेंट एंजॉय करताना दिसली होती. तिने आतापर्यंत आपले अनेक बोल्ड आणि ग्लॅमर्स फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिने शेअर केलेले फोटो तिच्या चाहत्यांच्याही पसंतीस उतरत असून यावर लाखांच्या संख्येत लाईकचा पाऊस पडताना दिसत आहे.