उरी सेक्टरमध्ये लष्कराची मोठी कारवाई, तीन आतंकवाद्यांचा खात्मा; शस्त्रसाठा जप्त

जम्मू कश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये 18 सप्टेंबरपासून लष्कराची मोठी शोध कारवाई सुरू होती. आज ते ऑपरेशन संपले असून लष्कराला या कारवाईत मोठे यश मिळाले आहे. लष्कराने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला असून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे.

uri-sector

18 सप्टेंबरला लष्कराने उरी सेक्टरमध्ये शोध कारवाई सुरू केली त्यानंतर परिसरातले इंटरनेट पण बंद करण्यात आले होते. या ऑपरेशनच्यादरम्यान रामपूरजवळ तीन आतंकवाद्यांचा खात्मा केला. हे दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडून जवानांनी 5 एके 47 रायफल्स, 8 पिस्तूल, 70 हँड ग्रेनेड व पाकिस्तानी चलन जप्त केले आहे.

उरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांच्या संशयित हालचाली दिसल्यानंतर जवानांनी या भागात शोध मोहीत सुरू केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या