अणुहल्ल्यापासून बचाव करणार आयोडिनची गोळी! अमेरिका 2 हजार 389 कोटींच्या गोळय़ा खरेदी करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेने एकाच वेळी तब्बल 2 हजार 389 कोटी रुपयांच्या आयोडीन गोळ्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठय़ा प्रमाणात आयोडीन गोळ्यांची खरेदी केली जात आहे. अर्थात त्यामागचे कारणही तितकेच भीतीदायक आहे. अणुहल्ल्यापासून बचाव करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

रशिया आणि युव्रेन यांच्यात अजूनही युद्ध भडकलेलेच आहे. त्यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अणुयुद्धाची धमकी दिल्याने सर्वांच्याच पोटात गोळा उठला आहे. त्यामुळेच अमेरिकेसह युरोपमधील अनेक देश सतर्क झाले असून संभाव्य स्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक पावले टाकली जात आहेत. त्यातूनच अमेरिकेतील बायडेन सरकारने आयोडीनच्या गोळ्यांचा मुबलक साठा करण्याचे ठरवले आहे. रासायनिक, जैविक, रेडियोलॉजिकल वा अणुहल्ला झाल्यास भीषण स्थिती उद्भवू शकते. किरणोत्सर्ग होऊन पॅन्सरसारख्या जिवघेण्या आजारांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी यापासून बचाव करण्याचे काम आयोडीनच्या गोळ्या वा सिरप करणार आहेत म्हणूनच केवळ अमेरिकाच नव्हे तर युरोपमधील अनेक देशांतही आयोडीन गोळ्यांचा साठा केला जात आहे.

पुतीन–बायडेन यांच्यात वाकयुद्ध होताच…

रशिया आणि रशियातील जनतेच्या संरक्षणासाठी आम्ही प्रसंगी आमच्या भात्यातील सर्वात संहारक अस्त्राचा वापर करू, अशी धमकी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिली होती. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनीही पलटवार केला होता. जग अखेरच्या युद्धाच्या जवळ पोहचले आहे, असे ते म्हणाले होते. त्यामुळेच तणाव वाढत चालला असून जगावरील अणुयुद्धाचे ढग गडद होत चालल्याचे बोलले जात आहे.

युरोपही भीतीच्या छायेत

युरोपमध्येही किरणोत्सर्गापासून बचाव करणाऱ्या गोळ्या आणि अन्य औषधांची विक्री वाढली आहे. रशिया आणि युव्रेनला लागून असलेल्या पोलंडच्या राजधानीत या औषधांच्या विक्रीसाठी 600 वितरण पेंद्रे उघडण्यात आली आहेत. पोलंडच्या सर्व 16 प्रांतांतही अशी पेंद्रे सध्या सुरू आहेत. प्रत्येक प्रांतात सरासरी 45 लाख आयोडीन गोळ्यांचा साठा पाठवण्यात आला आहे. ब्रिटनमध्येही अशीच स्थिती आहे. पोटॅशियम आयोडाईड औषधांची विक्री वाढली असल्याचे ऑक्सफर्ड हेल्थ पंपनीने नमूद केले आहे. याशिवाय युरोपीय महासंघाने युद्धग्रस्त युव्रेनला 55 लाख पोटॅशियम आयोडाईड गोळ्यांची खेप पाठवली आहे. युरोपमधील आणखी एक देश फिनलँडने मार्च महिन्यातच पोटॅशियम आयोडाईडची 90 हजाराहून अधिक पाकिटे खरेदी केली आहेत.