अजब गजब डाएट, बियर पिऊन केलं वजन कमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क

बियरबद्दल अनेक समज आणि गैरसमज आहेत. बियर प्यायल्याने पोट सुटतं यापासून ते वजन वाढतं, त्वचा काळवंडते यामुळे बियरपासून लांब राहा असा सल्ला मित्रमंडळी देत असतात. पण अमेरिकेत बियर डाएट केल्याने एका 132 किलो असले 46 दिवसात 20 किलो वजन कमी केले.

46 दिवस त्याने फक्त बियर घेतली होती. यादरम्यान त्याने फक्त लिक्विड डाएट म्हणून बियर घेतली. यामुळे त्याचे 44 पौंड्स म्हणजे 20 किलो वजन कमी झाले. डेल एका मद्यनिर्मिती कंपनीत कामाला असून ओहियो शहरात राहतो. मॉन्कस वापरात असलेले लिक्विड डाएट बघून आपल्या मनात बियर डाएटचा विचार आल्याचे त्याने सांगितले आहे. तसेच या डाएटचा त्यांना अजिबात त्रास झाली नाही. असेही त्यांनी म्हटले आहे. बियरमध्ये कार्बोहायड्रेट आणि अनेक पोषक तत्वेही असल्याचे तज्ज्ञ मार्टीन जुबेर यांनी म्हटले आहे. बियर डाएटमुळे वजन हलके झाल्याचे तर जाणवतेच शिवाय तरुण झाल्यासारखेही वाटले असे डेल म्हणाले आहेत.