ट्रम्प यांच्या डिनर पार्टीतच हाणामारी; अर्थमंत्री स्कॉट बेझंट आणि उच्च वित्त अधिकाऱ्यांमध्ये जुंपली

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या टॅरिफमुळे चर्चेत आहेत. आता त्यांनी आयोजित केलेल्या डिनर पार्टीत हाणामारी झाल्याने पुन्हा एकदा याची सोशल मिडीयावर चर्चा होत आहे. ट्रम्प यांनी आयोजित केलेल्या मेजवानीत अर्थमंत्री स्कॉट बेझंट आणि उच्च वित्त अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली आणि त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. अर्थमंत्री स्कॉट बेझंट आणि बिल पुल्ट हे ट्रम्प प्रशासनातील दोन उच्च अधिकारी आहेत. या घटनेमुळे त्यांच्यातील वैयक्तिक आणि व्यावसायिक तणाव चव्हाट्यावर आले आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत एका अधिकाऱ्याने दुसऱ्याला म्हटले, ‘मी तुझे थोबाड फोडून टाकेन… बाहेर पड’. तर दुसऱ्यानेही त्याला प्रत्युत्तर दिले आणि त्याचे हाणामारीत रुपांतर झाले. ही घटना वॉशिंग्टन डीसीमधील एका खास क्लब “एक्झिक्युटिव्ह ब्रांच” च्या उद्घाटनादरम्यान आणि पॉडकास्ट होस्ट चामथ पलिहापितिया यांच्या वाढदिवसानिमित्त घडली. ट्रम्प यांच्यात हाणामारी झालेल्या दोन अधिकाऱ्यांमध्ये अर्थ सचिव स्कॉट बेसंट आणि फेडरल हाऊसिंग फायनान्स एजन्सीचे संचालक बिल पुल्टे यांचा समावेश होता.

सीएनएनच्या मते, एक्झिक्युटिव्ह क्लबमध्ये डिनर दरम्यान, स्कॉट बेसंट यांनी पुल्टे यांना बुक्का मारण्याची धमकी दिली. बेसंट यांना समजले की बिल पुल्टे ट्रम्प यांच्यासमोर त्यांच्याबद्दल गप्पा मारत आहेत. त्यामुळे संतापलेल्या बेसंट यांनी पुल्टे यांना धमकी दिली. कॉकटेल पार्टीच्या गोंगाटात, बेझंटने पुल्टेंना शिवीगाळ करत टिप्पणी केली. फेडरल हाऊसिंग फायनान्स एजन्सीचे संचालक ट्रम्प यांच्यासमोर त्यांच्याबाबत बोलत होते, हे समजल्याने बेसंट संतापले होते.

याचा राग मनात धरत बेझंट पुल्टेला म्हणाले, तू माझ्याबद्दल राष्ट्रपतींशी का बोलत आहेस? नरकात जा. मी तुझे थोबाड रंगवेन. ला तोंडावर मुक्का मारेन. अचानक आलेल्या बेझंटच्या प्रतिक्रियेनंतर पुल्टे स्तब्ध झाले. प्रत्यक्षदर्शींच्या मते, या तणावपूर्ण चकमकीनंतर, क्लबचे सह-मालक आणि वित्तपुरवठादार ओमिद मलिक यांना हस्तक्षेप करावा लागला. परंतु बेझंटला हे मान्य नव्हते. तो पुल्टेलाच पक्षातून बाहेर काढू इच्छित होता. बेझंट क्लब मालकाला म्हणाले, एकतर तो इथेच राहील किंवा मी जाईन. तुम्ही मला सांगा की येथून कोण निघून जाईल. परिस्थिती निवळण्यासाठी त्या दोघांना वेगळे केले आणि शांत होण्यासाठी बेझंटला क्लबच्या दुसऱ्या भागात नेले. जेवणाच्या वेळी, बेझंट आणि पुल्टे टेबलाच्या विरुद्ध टोकांना बसले होते.

ट्रम्प सल्लागाराशी बेझंटचा वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. या वर्षाच्या सुरुवातीला बेझंटची एलोन मस्कशी जोरदार बाचाबाची झाली होती. बेझंट, पुल्टे आणि व्हाईट हाऊसने या घटनेवर भाष्य करण्यास नकार दिला आहे. ट्रम्प यांना आशा होती की तिघेही एकत्र काम करतील. मात्र, त्यांची ही आशा फोल ठरली असून अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली असून हाणामारी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ट्रम्प यांनी मे महिन्यात घोषणा केली होती की बेझंट, वाणिज्य सचिव लुटनिक आणि पुल्टे एकत्र काम करतील. मात्र, सद्यस्थितीनुसार या अधिकाऱ्यांमध्ये शीतयुद्ध सुरू झाले आहे.