USA-Israel Iran War – मध्य पूर्वेत युद्धाचा भडका अन् क्रिकेटला फटका; वर्ल्ड कपचे 6 सामने रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक क्षेत्र प्रभावित झाली आहेत. फुटबॉलसह क्रिकेट जगतालाही त्याचा जोरदार फटका बसला आहे. या युद्धामुळे नेपाळमध्ये खेळण्यात येणाऱ्या ICC Men’s Cricket World Cup League 2 चे एकूण सहा सामने थेट रद्द करण्यात आले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

ICC Men’s Cricket World Cup League 2 च्या अंतर्गत नेपाळच्या त्रिभूवन आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या मैदानावर नेपाळ, ओमान आणि युएई यांच्यामध्ये तिरंगी मालिका खेळली जाणार होती. मात्र, आता सुरक्षेच्या कारणास्तव ही तिरंगी मालिका स्थगित करण्यात आली आहे. ही तिरंगी मालिका 2027 च्या वनडे वर्ल्ड कपच्या पात्रता प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे तिन्ही देशांसाठी ही मालिका महत्त्वाची आहे. 10 मार्च पासून ही मालिका सुरू होणार होती. मात्र, आता ही मालिका स्थगित करण्यात आली असून नवीन तारखांची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. नेपाळ क्रिकेट बोर्डाने ट्वीटरवर पोस्ट करत याची माहिती दिली आहे.

ICC Men’s Cricket World Cup League 2 ही 8 संघांची लीग असून तीन वर्ष ही स्पर्धा खेळली जाते. सध्या 10 मार्च पासून नेपाळ, ओमान आणि युएई यांच्यामध्ये तिलंगी मालिका खेळली जाणार होती. मात्र, युद्धामुळे ती स्थगित करण्यात आली आहे. लीग-2 चा दुसरा राउंड एप्रिलमध्ये सुरू होणार असून यामध्ये स्कॉटलंड, ओमान आणि नामेबिया हे संघ खेळताना दिसतील.