उसेन बोल्ट म्हणतो, क्रिकेट माझ्या रक्तातच

‘वेगाचा बादशाह’ उसेन बोल्टला क्रिकेट वारसा हक्कानेच लाभला होता. वेगवान गोलंदाज बनायचे त्याचे स्वप्न होते, पण त्याचे स्वप्न साकार होऊ शकले. मात्र आता आगामी टी-20 वर्ल्ड कपचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर होऊन क्रिकेटशी नातं जोडता आले आणि टी-20 क्रिकेट हे आपले आवडते क्रिकेट आहे. एवढेच नव्हे तर क्रिकेट माझ्या रक्तात असल्याचेही त्याने अभिमानाने सांगितले.

मी क्रिकेट पाहूनच लहानाचा मोठा झालो. माझे बाबा क्रिकेटचे मोठे चाहते होते आणि आताही आहेत. तेच माझ्या रक्तात आहे. ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून क्रिकेटशी जोडले गेल्याचा मला आनंद झालाय. क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाज बनने माझे स्वप्न होते, पण ते पूर्ण होऊ शकले नाही. मला आता जेव्हा ही संधी मिळते मी टी-20 आवर्जून पाहतो.

आजही वेस्ट इंडीजमध्ये टी-20 आणि वन डे क्रिकेट लोकप्रिय आहे. हा खेळ वेगाशी जोडला गेल्याचेही त्याने सांगितले. तसेच इनस्विंग यॉर्करचा बादशाह वसीम अक्रम आपला फेव्हरिट असल्याचे तो म्हणाला. माझ्या बाबांप्रमाणे मीसुद्धा वेस्ट इंडीज क्रिकेटचा चाहता होतो, पण मी सचिन तेंडुलकरचा चाहता असल्याचेही बोल्ट म्हणाला.