
खरेदीत ग्राहकांची कशी फसवणूक होते याचा प्रत्यय पालीमध्ये आला आहे. जनार्दन भिलारे या पदवीधर शिक्षकाने सोमवारी फ्लिपकार्टवरून ऑनलाइन शॉपिंगवर सिलिंग फॅन मागवला. मात्र या फॅनच्या खोक्यामध्ये चक्क विटा पाठवण्यात आल्या. यामुळे त्यांना धक्काच बसला. कंपनीसोबत भांडून तक्रार केल्यानंतर त्यांना त्यांचे पैसे रिफंड करण्यात आले.
या फसवणुकीसंदर्भातील व्हिडीओ जनार्दन भिलारे यांनी सोशल मीडियावरदेखील पोस्ट केला आहे. भिलारे यांनी फ्लिपकार्टवर ऑनलाइन बजाज सिलिंग फॅन ऑर्डर केला. त्याप्रमाणे सोमवारी डिलिव्हरी प्राप्त झाली. खोका बजाज कंपनीच्या फॅनचा होता. मात्र तो उघडल्यावर फॅनऐवजी त्यामध्ये चक्क विटांचे तीन तुकडे निघाले. त्यानंतर त्यांनी ऑनलाइन तक्रार केली. रात्री मोबाईलवर संपर्क केल्यानंतर कंपनीकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली. तसेच 2430 रुपये घेतलेली रक्कम त्याच रात्री अकाऊंटवर जमा करण्यात आली.
सर्वांना सस्नेह नमस्कार 🙏 आज ऑनलाईन ग्राहकांची फसवणूक व मानसिक त्रास याबाबतचा व्हिडिओ पाठवीत आहे.मी जनार्दन भिलारे…
Posted by Janardan Bhilare on Wednesday, June 11, 2025