पणजीच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपतर्फे उत्पल पर्रीकर?

1

सामना ऑनलाईन । पणजी

पणजी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रदेश भाजपतर्फे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर आणि पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांची नावे केंद्रीय समितीकडे पाठवण्यात आली आहेत. आज सायंकाळी पणजीच्या उमेदवाराची घोषणा केली जाणार आहे.

पणजीचा उमेदवार ठरवण्यासाठी भाजपकडून काल दिवसभर चाचपणी करण्यात आली. सकाळी पणजी मनपाच्या नगरसेवकांची मते जाणून घेतल्यानंतर पणजी भाजप मंडळातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन सगळ्यांची मते जाणून घेतली.