
जगद् गुरू तुकाराम महाराज यांचे गुरू बाबाजी चैतन्य महाराज यांनी उत्तमापूर ते काशी पायी वारी करून हजारो भक्तांच्या मांदीयाळीत महाशिवरात्रीच्या दिवशी कीर्तनाचा सत्संग केला. हा धागा पकडून गेल्या 20 वर्षांपासून हभप गंगाराम महाराज डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तमापूर ते काशी ही दिंडी अव्याहतपणे सुरू आहे. या वर्षी या दिंडी सोहळ्यात जुन्नर तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब दांगट यांनी काशी विश्वेश्वर येथील स्वामीनारायण मंदिरामध्ये या दिंडीला भेट दिली.
संयोजकाच्या माध्यमातून त्यांचा सत्कार करण्यात आला. दांगट यांनी दिंडी सोहळ्यातील आयोजकांचे आभार मानत या पुढे हा सोहळा असाच वृद्धिंगत व्हावा, अशा शुभेच्छा दिल्या.
यावेळी शुभांगी जोशी (नाशिक), राजेंद्रसिंह लुकेसिंग जमादार त्याचबरोबर नेदरलँड येथील परदेशी भाविक महिलेचा सत्कार करण्यात आला. हभप धोंडीभाऊ पानसरे, प्रकाश मुरादे, सोपान चौधरी, गणपतशेठ डुंबरे, कारराव भोरे, शरद गाढवे, प्रकाश फापाळे, संतोष फापाळे, लक्ष्मण घुले, अविनाश ताजणे, प्रभाकर टिकेकर, सुभाष गाढवे, विमल काशीद, मीरा सुकाळे, अशोक फापाळे, किसन फापाळे, देवराम डोके, श्रीराम डुंबरे आदी जुन्नर तालुक्यातील भाविक, मान्यवर, संचालक आणि सभासद उपस्थित होते.

























































