
उत्तराखंडमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेक रस्त्यांना नद्यांचे स्वरुप प्राप्त झाले असून काही ठिकाणी पूल तुटले आहेत. यामुळे अनेक पर्यटकही अडकले आहेत. या पावसामुळे आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला असून 12 जण बेपत्ता झाले आहेत. चंपावत जिल्ह्यात एक घर कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. पाण्याची पातळी वाढल्याने चलठी नदीवरील निर्माणाधीन पूल कोसळला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
#WATCH | An under construction bridge, over a raging Chalthi River in Champawat, washed away due to rise in the water level caused by incessant rainfall in parts of Uttarakhand. pic.twitter.com/AaLBdClIwe
— ANI (@ANI) October 19, 2021
नैनी सरोवराचे पाणी रस्त्यावर आणि लोकांच्या घरात शिरले आहे. नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले. तसेच मुसळधार पावसामुळे नैनीताल, राणीखेत, अल्मोडाहून हल्दानी आणि काठगोदामपर्यंतचे सर्व रस्ते बंद झाले आहेत.
#WATCH | Uttarakhand: Nainital Lake overflows and floods the streets in Nainital & enters building and houses here. The region is receiving incessant heavy rainfall. pic.twitter.com/G2TLfNqo21
— ANI (@ANI) October 19, 2021
उत्तराखंडमधील मुसळधार पावसामुळे अनेक पर्यटक अडकले आहेत. आपत्ती विभागाने 22 पर्यटकांना सुखरुप बाहेर काढून त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे.
#WATCH: All gates of Nanak Sagar Dam in Uttarakhand’s Udham Singh Nagar opened following a rise in the water level due to heavy rainfall in the state. pic.twitter.com/A7GRZEXJD9
— ANI (@ANI) October 19, 2021
Salute these Bravehearts ❤️#Nainital #Uttrakhand pic.twitter.com/ZdO5Fxvp3p
— Srinivas BV (@srinivasiyc) October 19, 2021
नैनीताल मध्ये भुस्खलन
नैनीतालमध्ये भुस्खलन झले असून त्यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. मिळलेल्या माहितीनुसार नैनीतलच्या रामगढमध्ये 10 मजूर ढिगार्याhखाली अडकले होते. त्यापैकी एका मजुराला काढण्यात यश आले असून 5 मजुरांचे मृतदेह सापडले आहेत. अजूनही चार मजूर बेपत्ता आहेत. मृतांमधील्मजूर उत्तर प्रदेश आणि बिहारचे रहिवासी होते.




























































