उत्तराखंडमध्ये खलिस्तानी दहशतवादी सक्रिय, गुप्तचर विभाग करतोय तपास

360

पंजाबमध्ये काही दिवसांपूर्वी खलिस्तानी दहशतवादी पकडल्याची घटना ताजी असताना आता त्यांनी देशातील इतर राज्यांमध्ये हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. उत्तराखंडच्या देहरादून, हरिद्वार आणि उधमसिंह जिल्हय़ात खलिस्तानी दहशतवादी सक्रिय झाले असल्याची माहिती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर, गुप्तचर विभाग अधिक तपास करत आहे.

दिल्लीत 1984 साली इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या शीख दंगलीनंतर खलिस्तानची मागणी पुढे आली. पाकिस्तानचा खलिस्तानी चळवळीला छुपा पाठिंबा आहे. त्या काळी खलिस्तानी चळवळीने उत्तराखंडच्या डोईवाला, नैनीताल, हरिद्वार, उधमसिंह या जिल्ह्य़ांत बस्तान बसवले होते. सरकारने ही चळवळ पूर्णपणे मोडून काढली होती.

कश्मीर ते खलिस्तान

हिंदुस्थानने कश्मीरमधून 370 कलम रद्द केल्यानंतर पाकिस्तानने कश्मीर आणि देशातील इतर भागांत घुसखोरी करण्याचा, घातपाती कारवाया करण्याचा प्रयत्न केला. पण त्यात यश न आल्यामुळे पाकिस्तानने पुन्हा खलिस्तानी दहशतवाद्यांना जवळ करून घातपाती कारवायांसाठी मदत करायला सुरुवात केली.

आपली प्रतिक्रिया द्या