
पहलगाम हल्ल्यानंतर हिंदूस्थान -पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर, वाणी कपूरने फवाद खानसोबतच्या ‘अबीर गुलाल’ चित्रपटाशी संबंधित सर्व पोस्ट इंस्टाग्रामवरून काढून टाकल्या आहेत. हिंदुस्थानात या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. अशा परिस्थितीत हिंदुस्थानात पाकिस्तानी कलाकारांचे सोशल मीडिया अकाउंट्स ब्लॉक करण्यासोबतच फवाद खान आणि वाणी कपूरच्या ‘अबीर गुलाल’ या चित्रपटावर देखील बंदी घालण्यात आली आहे. आता वाणी कपूरने तिच्या इंस्टाग्राम हँडलवरून चित्रपटाशी संबंधित सर्व पोस्ट काढून टाकल्या आहेत. 9मे रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार होता. पण आता सगळं थांबलं आहे. वाणीच्या सोशल मीडिया व्यतिरिक्त, चित्रपटाशी संबंधित सर्व गाणी आणि प्रमोशनल कंटेंट YouTube इंडियावरून काढून टाकण्यात आले आहे.
हिंदूस्थान सरकारने अनेक प्रमुख पाकिस्तानी कलाकारांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर प्रवेश रोखल्यानंतर अभिनेत्रीने तिच्या हँडलवरून चित्रपटाचे सर्व पोस्ट हटवण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदूस्थानात आता प्रतिबंधित असलेल्यांमध्ये फवाद खान, गायक आतिफ असलम आणि उस्ताद राहत फतेह अली खान यांचा समावेश आहे.