
मुंबई उच्च न्यायालयात नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱया तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई उच्च न्यायालयात लिपिक, शिपाई, स्टेनोग्राफर आणि चालक या पदांसाठी एकूण 2 हजार 381 पदांची भरती काढली आहे. 10 वी उत्तीर्ण ते पदवीधर असलेले तरुण या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. लिपिक पदांच्या 1382 जागा, शिपाई पदांच्या 887 जागा, ड्रायव्हरच्या 37 जागा, स्टेनोग्राफर वरिष्ठच्या 56 जागा, स्टेनोग्राफरच्या कनिष्ठ 19 अशा एकूण 2 हजार 381 जागांची भरती केली जाणार आहे. या भरतीसंबंधी वयोमर्यादा, शुल्क, परीक्षेचे स्वरूप, निवड प्रक्रिया, पगार, अर्ज करण्याची पद्धत अशा सर्वांची सविस्तर माहिती bombayhighcourt.nic.in या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे.

























































