‘मिशन धारावी’ अवघ्या 23 दिवसांत 27 हजार नागरिकांचे लसीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार व मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार राहुल शेवाळे आणि महापालिका जी उत्तर विभाग सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर, डॉ. विरेंद्र मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महानगरपालिका जी उत्तर विभाग, सिटी बँक आणि जसलोक रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने ’मिशन धारावी’ मोहिमेअंतर्गत डॉ. श्रद्धा कांबळे, डॉ. आशुतोष गुप्ता यांच्या अथक प्रयत्नाने अवघ्या 23 दिवसांत 27 हजार नागरिकांचे महापालिका संक्रमण शिबीर धारावी येथे लसीकरण करण्यात आले आहे.

मुंबई सुवर्णकार संघ आणि शिवसेना उपशाखा प्रमुख संतोष देवरुखकर यांच्या पुढाकाराने सुवर्णकार व त्यांच्या कुटुंबातील 900 सदस्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. या मोहिमेत शेड, स्नेहा, मॅजिक बस, रिऑलिटी कोर्स, बिजेएस, वर्ल्ड व्हिजन या संस्थांचे विशेष सहकार्य लाभले आहे.