
लहान मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लस येत्या सहा महिन्यांत उपलब्ध होईल, अशी घोषणा पुण्यातील सिरम इन्स्टिटय़ूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी आज केली. त्यामुळे लहान मुलांनाही आता लवकरच लस मिळू शकणार आहे.
अदर पुनावाला यांनी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) आयोजित चर्चासत्रात भाग घेतला होता. त्यावेळी त्यांनी सिरम इन्स्टिटय़ूटकडून खास लहान मुलांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘कोव्हावॅक्स’ या लसीबाबत माहिती दिली. लसीची निर्मिती, तिच्या चाचण्या आणि त्या चाचण्यांमधून आलेले निष्कर्ष याबाबत त्यांनी माहिती दिली. कोव्हावॅक्स या लसीच्या चाचण्या करण्यात येत आहेत. तीन वर्षांच्या मुलांवरही या लसीची चाचणी केली गेली आणि तिचे निष्कर्ष चांगले आहेत, असे पुनावाला यांनी सांगितले.
View this post on Instagram
हिंदुस्थानमधील लसीकरण कार्यक्रमात कोव्हिशिल्डचे प्रमाण मोठे आहे. 18 वर्षांखालील वयोगटासाठी आणि तीन वर्षांच्या मुलांनाही देता येईल अशी लस तयार करत असल्याची घोषणा सिरमने केली होती.































































