शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वडाळा विधानसभेतील युवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. सदर नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱयाचे काम बघून कायम करण्यात येणार आहेत.
उपविभाग युवा अधिकारीपदी जितू दोडमणी (शाखा क्र. 177, 178), सुदर्शन मयेकर (शाखा क्र. 200, 201) यांच्या तर विधानसभा समन्वयकपदी गुरूप्रीत सिंग शरद, रूपेश झाझम, स्वप्नील सोनावणे, जिनेश भेदा, सौरभ सावंत, प्रतिश बोरगे यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. विधानसभा चिटणीसपदी प्रणेश कुलकर्णी, जयेश शिर्पे, आदित्य पवार, अनिकेत सकपाळ, स्वप्नील केसरकर, उमर सिद्दीकी यांची नियुक्ती केली आहे. उपविधानसभा समन्वयकपदी अक्षय मोरे, संजय व्हनावळे यांची तर उपविधानसभा चिटणीसपदी साहिल पारकर, अझहर निसार शेख यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
शाखा युवा अधिकारीपदी श्रीकांत बिरवडकर (शाखा क्र. 177), शाखा समन्वयकपदी आदेश लखादे (शाखा क्र. 177), शाखा युवा अधिकारीपदी प्रणय मंचेकर (शाखा क्र. 178), शाखा समन्वयकपदी ओमकार भालेकर (शाखा क्र. 178), शाखा युवा अधिकारीपदी कल्पेश शाह (शाखा क्र. 200), शाखा समन्वयकपदी राहुल मोहिते (शाखा क्र. 200), शाखा युवा अधिकारीपदी रोहन काळे (शाखा क्र. 201), शाखा समन्वयकपदी दीपक पाटील (शाखा क्र. 201) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. सोशल मीडिया समन्वयकपदी विनायक पेडणेकर (शाखा क्र. 200, 201), प्रथमेश मिराशी (शाखा क्र. 177, 178), कार्तिष वाडकर (शाखा क्र. 177), मनीष उंबे (शाखा क्र. 178), सुजल मंचेकर (शाखा क्र. 178), राज सोलंकी (शाखा क्र. 200), अनिकेत पांडे (शाखा क्र. 201), ऋषी जावळे (शाखा क्र. 201) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.





























































