Vaibhav Suryavanshi चा जलवा कायम; 90 चेंडूंमध्ये 190 धावांचा पाडला पाऊस, व्हिडीओ होतोय व्हायरलं

टीम इंडियाचा उगवता सितारा 14 वर्षीय वैभव सुर्यवंशीने IPL 2025 मध्ये तडाखेबंद फलंदाजी करत सर्वांनाच आश्चर्यचकित केलं होतं. त्यामुळे क्रिकेट विश्वात त्याच्या नावाची जोरदार चर्चा झाली. आता पुन्हा एकदा त्याने एका सराव सामन्यात गोलंदाजांना चोपून काढत फक्त 90 चेंडूंमध्ये 190 धावांची वादळी खेळी केली आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

BCCI च्या बंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये वैभवने एका सराव सामन्यात धावांचा पाऊस पाडला होता. परंतु त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 10 जून रोजी एक सराव सामना पार पडला होता. या सामन्यात त्याने मनसोक्त फलंदाजी करत गोलंदाजांची धुलाई केली होती. वैभवच्या फलंदाजीची धार आयपीएलमध्येही पाहायला मिळाली होती. पहिल्याच सामन्यात त्याने 20 चेंडूंमध्ये 34 धावा केल्या होत्या. विशेष म्हणजेच षटकार ठोकून त्याने आपला आयपीएलचा श्री गणेशा केला होता. तसेच गुजरात टायटन्सविरुद्ध 38 चेंडूंमध्ये 101 धावांची झंझावाती खेळी केली होती. आयपीएलच्या इतिहासातील हे दुसरे वेगवान अर्धशतक होतं, जे वैभवच्या बॅटीतून आलं होतं. आयपीएलच्या पूर्ण हंगामात त्याने 7 सामन्यांमध्ये 252 धावा केल्या होत्या. आज तकने यासंदर्भात वृत्त दिले आहे.