वलांडी येथे अज्ञात चोरट्यांनी घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने पळवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवणी तालुक्यातील वलांडी येथे अज्ञात चोरट्यांनी घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने, असा एकूण 57,430 रुपयांचा ऐवज पळवला. या चोरीप्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात रिजवाना शौकत फकीर यांनी तक्रार दाखल केली. रिजवाना यांच्या वडिलांना लातूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना पाहण्यासाठी त्या लातूर येथे गेल्या होत्या.

घरी त्यांचा नवरा आणि मुलगा होता. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी खोलीचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गळसर किंमत 34,500 रुपये, सोन्याचा खडा आणि मासोळी 2 ग्रॅम किंमत 1,260, सोन्याचा जोंधळा मणी 10 नग 500 मिलीग्रॅम किंमत 1,720 रुपये, सोन्याचे 1 ग्रॅम 30 मिली.चे मणी किंमत 2 हजार रुपये, चांदीचे बिंदले किंमत 800 रुपये, सोन्याची फुलजोडी मेहबुबा 1 ग्रॅम 9 मिली. किंमत 10,250 रुपये, सोन्याचे सरपाळे 1 ग्रॅम 50 मिली.चे किंमत 5,600 रुपये, चांदीची चैन आणि अंगठी 22 ग्रॅम वजनाची किंमत 1300 रुपये, असे एकूण 57,430 रुपयांचे दागिने चोरुन नेले. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.