बोटासने जिंकली मोसमातील पहिली शर्यत फॉर्म्युला वन

395

फॉर्म्युला वनमधील पहिली रेस रविवारी पार पडली. वॉलटेरी बोटास याने ही रेस जिंकत मोसमातील गुणांचे खाते उघडले. गतविजेता लुईस हॅमिल्टन याला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. या रेसदरम्यान वर्णद्वेषाविरुद्धच्या मोहिमेचे समर्थन करण्यात आले. या रेसमध्ये सहभागी झालेल्या 20पैकी 14 रेसरनी गुडघ्यावर उभे राहून आपणही या लढाईविरोधात असल्याचे दाखवून दिले.

फॉर्म्युला वनमधील एकमेक कृष्णवर्णीय रेसर लुईस हॅमिल्टन याला या रेसमध्ये आपली चमक दाखवता आली नाही. 2016 सालानंतर लुईस हॅमिल्टनला येथील रेस जिंकता आलेली नाही. पेनल्टी मिळाल्यामुळे त्याला चौथ्या स्थानावरच समाधान मानावे लागले. फेरारीच्या चार्ल्स लेवलर्क याने अनपेक्षितरित्या दुसऱया स्थानावर झेप घेतली. मॅकलरेनच्या लँडो नोरीसने तिसरे स्थान पटकावले.

कोरोनामुळे सात रेस रद्द

कोरोनाचा फटका फॉर्म्युला वन रेसलाही बसला आहे. दरवर्षी मार्च महिन्यापासून या स्पर्धेच्या चॅम्पियनशिपला सुरूवात होते. मात्र कोरोनामुळे जुलै महिन्यापासून या स्पर्धेला सुरूवात झाली आहे. त्यामुळे सात रेसही रद्द करण्यात आल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या