सहलीसाठी निघालेल्या टेम्पो ट्रॅव्हलला अपघात, 2 ठार तर 25 जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
accident-vasai-pune

सामना प्रतिनिधी । वसई

वसईहून महाबळेश्वरला सहलीसाठी चाललेल्या प्रवाशांच्या टेम्पो ट्रॅव्हलरला मुंबई-पुणे रस्त्यावर लोणावळ्याजवळील माडप बोगद्याजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 2 जण ठार तर 25 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

सहलीसाठी वसईहून महाबळेश्वर येथे निघालेल्या प्रवाशांच्या भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरची कंटेनरला मागून जोरात बसली. हा अपघात इतका भीषण होता की जोसेफ मनवेल सेरेजो (62) आणि कांबळे नावाचा चालक अशा दोघांचा मृत्यू झाला. तर फलॉरी जोसेफ सेरेजो (50), अॅलिसन जोसेफ सेरेजो (30), आलफिया जोसेफ सेरेजो (23), नाबर्ट सेरेजो (60), अर्णेला सेरेजो (54), क्रिस्‍टल सेरेजो (22), सलाईन सेरेजो (17), मार्शल सेरेजो (72), फलॉरी परेरा (70), स्‍टॅनी परेरा (75), जॉयनेल सिल्‍वेरा (35), वंदना वर्तक (35), कृतांगी वर्तक (6), जयप्रकाश वर्तक (48), ब्रायन सिल्‍वेरा (50), प्रिती घोन्‍सालवीस (25), वैशाली डिमेलो (26), संजय डिमेला (28) हे जखमी आहेत. हे सर्वजण वसईचे रहिवासी आहेत.