सराईत वाहनचोराला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुचाकींची चोरी करणाऱ्या सराईताला  दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने अटक केली. मागील दोन वर्षांपासून तो फरार होता. दिपेश उर्फ दिपक यशवंत शिर्के  (वय 31 रा  दत्तनगर,  कात्रज) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकातील अधिकारी व कर्मचारी हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी सराईत वाहनचोर एकाठिकाणी येणार असल्याची माहिती पोलिस नाईक अतुल मेंगे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून दीपेशला ताब्यात घेतले. चौकशीत  त्याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनचोरी केल्याची कबुली दिली.  त्याला वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे, शेख, निलेश शिवतरे,  अतुल मेंगे,  धनंजय ताजणे, सुमित ताकपेरे  यांनी केली.