सामना प्रतिनिधी । मुंबई
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विभाग क्रमांक 8 मधील घाटकोपर (पूर्व), घाटकोपर (पश्चिम), शिवाजीनगर-मानखुर्द विधानसभेतील युवासेना पदाधिकार्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. सदर नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपाच्या असून सहा महिन्यांनंतर पदाधिकार्यांचे काम बघून कायम करण्यात येणार आहेत.
घाटकोपर (पूर्व) : विभाग युवा अधिकारीपदी रवींद्र शेणॉय, उपविभाग युवा अधिकारीपदी लवकेश फेपडे (शाखा क्र. 125/ 131), विराज शिंदे (शाखा क्र. 130/ 132), अमोल खाडे (शाखा क्र. 133) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा चिटणीसपदी अजिंक्य वाणी, यश परुळेकर, गौरव दरेकर यांची तर विधानसभा समन्वयकपदी विशाल चावक, लक्की सोहल, रेहान शेख यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. तसेच शाखा युवा अधिकारीपदी सागर कुमठेकर (शाखा क्र. 125), हेमंत वालझडे (शाखा क्र. 130), मनीष डिचोलकर (शाखा क्र. 131), प्रदीप जोशी (शाखा क्र. 133) यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
घाटकोपर (पश्चिम) :
विभाग युवा अधिकारीपदी अभिषेक दशरथ मोरे यांची तर विधानसभा समन्वयकपदी गणेश दशरथ डोंगरे, अमोल अर्जुन पडवळ यांची नियुक्ती केली आहे.
शिवाजीनगर-मानखुर्द :
विभाग युवा अधिकारीपदी गणेश वाव्हळ (शाखा क्र. 134/ 136/ 137/ 138), किरण बाबा म्हस्के (शाखा क्र. 135/ 139/ 140/ 141/142) यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
भारतीय विद्यार्थी सेना घाटकोपर (पूर्व) :
विभाग संघटकपदी लालजी निषाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपविभाग संघटकपदी दर्शन चव्हाण (शाखा क्र. 125/ 131), महेंद्र भुते (शाखा क्र. 130), अजित घगवे (शाखा क्र. 133/ 132) यांच्या तर विभाग चिटणीसपदी भास्कर आवाद, किशोर केदारे, फिरोज शेख यांच्या नियुक्या करण्यात आल्या आहेत. शाखा संघटकपदी तेजस जाधव (शाखा क्र. 125), अनिकेत साखरकर (शाखा क्र. 130), प्रतीक आचरेकर (शाखा क्र. 131), चेतन पुजारी (शाखा क्र. 133), रोहित चंदेलिया (शाखा क्र. 132) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्याचे युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.





























































