जेएनयू विद्यापीठाच्या कुलगुरूपदी प्रा. शांतीश्री धुलीपुडी पंडित, पहिल्या महिला कुलगुरू होण्याचा मान पटकावला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जवाहरलाल नेहरू (जेएनयू) विद्यापीठाच्या कुलगुरुपदी प्रा. शांतीश्री धुलीपुडी पंडित यांची निवड करण्यात आली आहे. जेएनयूच्या पहिल्या महिला कुलगुरू होण्याचा मान त्यांना मिळविला असून त्या जेएनयूच्या माजी विद्यार्थिनीदेखील आहेत.

जेएनयूचे प्रभारी कुलगुरू प्रा, एम. जगदेश कुमार यांची विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. 59 वर्षीय प्रा. पंडीत या पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठात राजकारण आणि लोकप्रशासन हे विषय शिकवितात. पेंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जेएनयू विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून प्रा. पंडित यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीदेखील पंडीत यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे.

जेएनयूच्या माजी विद्यार्थिनी असलेल्या पंडीत यांनी याच विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय संबंधात एमफिल आणि हिंदुस्थानी संसद आणि परराष्ट्र धोरण या विषयावर पीएचडी केली आहे. तसेच प्रेसिडेन्सी कॉलेज, मद्रास आणि पॅलिपहर्निया स्टेट युनिव्हर्सिटीमध्येही शिक्षण घेतले. त्यांनी प्राध्यापिका म्हणून आपले करीअर 1988 मध्ये गोवा विद्यापीठातून सुरू केले. त्यानंतर 1993 मध्ये त्या पुणे विद्यापीठात रुजू झाल्या. त्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सदस्यदेखील आहेत.

जगदेश कुमार यांच्या जागी नियुक्ती

जेएनयूचे प्रभारी कुलगुरू प्रा. एम जगदेश कुमार यांची यूजीसीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. प्रा. कुमार त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यापासून कार्यवाह कुलगुरूपदाची जबाबदारी सांभाळत होते. विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्षपद डिसेंबर महिन्यापासून रिक्त आहे. प्रा. डी. पी. सिंग यांचा यूजीसीच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला. त्यांच्या जागी जगदेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.