विक्की कौशलला वाटते भुतांची भीती, पण करतोय हॉरर चित्रपट

645

‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ आणि ‘संजू’सारख्या चित्रपटातून आपली वेगळी ओळख निर्माण करणारा बॉलीवूड अभिनेता विक्की कौशल आता प्रेक्षकांना घाबरवण्यासाठी येत आहे. प्रत्यक्षात भुतांना घाबरणारा विक्की ‘भूत: द हॉन्टेड शिप’या चित्रपटातून पहिल्यांदाच भयपट करत आहे. आपण जरी या चित्रपटात काम करत असलो तरी प्रत्यक्षात मात्र मला भुताची भीती वाटते. त्यामुळे मी कधीही हॉरर चित्रपट बघत नाही असे विक्कीने सांगितले आहे.

भूत या चित्रपटातून पहिल्यांदाच आपण भयपटात काम करतोय. यातून मला खूप काही शिकायला मिळतंय, असेही विक्कीने म्हटलं आहे. तसेच यावर्षी त्याच्याकडे अनेक नवीन चित्रपट आहेत. पण हॉरर चित्रपटात तो पहिल्यांदाच काम करतोय. गंमत म्हणजे मीच या चित्रपटात काम करत असल्याने मी पहिल्यांदा हॉरर चित्रपट बघणार आहे. पण तो बघताना मला भीती वाटणार नाही. कारण चित्रपटात पुढे काय होणार हे मला माहीत आहे, असेही विक्कीने सांगितले. चित्रपटाचा फर्स्ट लुक पोस्टर रिलीज झाला आहे. एक भल्यामोठ्या जहाजात या चित्रपटाचे शूटींग करण्यात आले आहे. त्या जहाजात भूत असतात असे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. 21 फेब्रुवारी 2020 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याचे ट्वीट चित्रपट निर्माता करण जोहरने सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या