भयानक! भटक्या कुत्र्याचा चिमुरड्यावर हल्ला, व्हिडीओ व्हायरल

55

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका भटक्या कुत्र्याने दोन वर्षाच्या चिमुकल्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्याचा  व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. घराजवळच्या गल्लीत खेळत असलेल्या चिमुकल्यावर कुत्र्याने अचानक हल्ला केला. मुलाचा पाय जबड्यात पकडून कुत्र्याने त्याचे लचके तोडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने आजूबाच्या नागरिकांनी त्वरीत धाव घेऊन मुलाची कुत्र्याच्या तावडीतून सुटका केली. जखमी मुलावर सध्या महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अहमदाबादमधील जमालपूर परिसरातील ही घटना आहे. अहमदाबाद महानगर पालिकेकचे भटक्या कुत्र्यांवर कोणत्याच प्रकारचे नियंत्रण राहिलेले नाही. पालिकेने अनेक वर्षांपासून भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहिम बंद केल्याने कुत्र्यांच्या संख्येत भरमसाठ वाढ झाली आहे. त्यामुळे दिवसेंदिवर कुत्र्याच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून भटक्या कुत्र्यांवर तातडीने उपाय योजना करण्याची मागणी होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या