
सामना ऑनलाईन । चेन्नई
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी चेन्नईला पोहोचला आहे. धोनीसोबत त्याची पत्नी साक्षी आणि मुलगी झिवा देखील पोहोचल्या आहेत. चेन्नई एअरपोर्टमधून बाहेर निघताना फोटोग्राफर्स झिवा…झिवा असे ओरडू लागले. त्यावेळी झिवा मागे वळून ‘No photo please’ असे म्हणाली. झिवाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ZIVA Arrived in her style At Chennai
“No Photo Pls” #TNWelcomesDHONI pic.twitter.com/VioIORESNK
— DHONIsm™ ❤️ (@DHONIism) March 15, 2019
23 मार्चपासून आयपीएलचा 12 वा मोसम सुरू होत आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यामध्ये होणार आहे. यासाठी महेंद्र सिंह धोनी सहकुटुंब चेन्नईला दाखल झाला आहे. धोनीसोबत केदार जाधव आणि शार्दुल ठाकुरदेखील चेन्नईला पोहोचले आहेत.






























































