
गुजरात टायटन्सचा ओपनर फलंदाज शुभमन गिल तडाखेबंद खेळी खेळत होता. दुसऱ्या षटकात दिपक चहरने त्याचा झेल सोडल्यामुळे गिलला जीवनदान मिळाले. त्याचा फायदा घेत गिलने फटकेबाजी करायला सुरुवात केली. गिल टिकला तर गुजरात नक्कीच मोठा स्कोअर करणार हे सर्वांनाच माहित होते. त्यामुळे गिलला बाद करण्यात चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीने कोणतीच चूक केली नाही. स्टंपमागे असलेल्या धोनीने क्षणाचाही विलंब न करता गिलला बाद केले.
Watched it..still working on believing it! #IPL2023Final #CSKvGT #WhistlePodu #Yellove 🦁💛pic.twitter.com/q6MY0i798b
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 29, 2023





























































