Video – अशा प्रकारे तयार केले जाते तीस हजार रुपये किलोने विकले जाणारे ‘हिंग’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रत्येक घरात डाळीच्या व काही भाज्यांच्या फोडणीत हिंगाचा वापर केला जातो. हिंग हे बाजारात खूप महाग मिळते. छोट्याश्या डबीत घरात येणारे हे हिंग स्वयंपाकघरातील महत्त्वाच्या पदार्थांपैकी एक आहे. हे हिंग तयार कसे होते याचा आपण कधीच विचार करत नाही. मात्र हे तयार करण्याची प्रक्रीया फारच किचकट असून प्रसिद्ध फूड ब्लॉगर अमर सिरोही याने ती प्रक्रीया त्याच्या फूडी इनकार्नेट या पेजवर शेअर केली आहे.