Video- मुलीला आरती करताना पाहून शाहिद अफ्रिदी भडकला, फोडला टीव्ही

4039

पाकिस्तानात हिंदूंबाबत असलेली चीड पुन्हा एकदा नव्याने समोर आली आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटू दानिश कानेरियाला दिलेल्या वागणूकीनंतर आता शाहिद अफ्रिदीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत त्याला हिंदू धर्माबद्दल असलेली चीड स्पष्ट दिसून येत आहे.

शहिद अफ्रिदीची एक मुलाखत सुरू असताना त्याला निवेदिकेने तु कधी टीव्ही फोडलायस का असे विचारले. त्यावर त्याने त्याच्या घरात घडलेला एक किस्सा शेयर केला. ‘माझी बेगम त्या स्टार प्लसवरच्या मालिका बघायची. त्यात त्या आरती वगैरे दाखवली जायची. एके दिवशी माझी मुलगी देखील हातात ताट घेऊन टीव्ही समोर आरती सारखं काहीतरी करत होती. तिला ते करताना बघून मला इतका राग आला की मी तो टीव्ही जोरात भिंतीवर आदळला’, असे शहिद अफ्रिदीने या मुलाखतीत सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या