Video- दरोडा घालायला आला आणि ‘पप्पी’ घेऊन गेला!

2420

दरोडेखोर, लुटारू हे शब्द जरी ऐकले तरी आपल्याला धडकी भरते. क्रूर भाव असलेले, कधीही हल्ला करतील असे भीषण वाटणारे दरोडेखोर पाहून कुणाचीही बोबडी वळेल. पण, एका दरोडेखोराने मात्र एका महिलेला त्याचं प्रेमळ रूप दाखवलं आहे.

सोशल मीडियावर या अनोख्या दरोड्याचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत एका स्टोअरमध्ये दोन जण दरोडा टाकताना दिसत आहेत. त्यांना पाहून स्टोअरमधले ग्राहक आणि मालकांची घाबरगुंडी उडाली आहे. पण, तितक्यात एक विचित्र आणि तितकीच लोभस घटना घडताना या व्हिडीओत दिसते.

हा व्हिडीओ ब्राझीलमधल्या एका मेडिकल स्टोअरचा आहे. त्या मेडिकल स्टोअरमध्ये हेल्मेटधारी लुटारूंनी दरोडा टाकला. तेव्हा तिथे उपस्थित असलेली एक वृद्ध महिला चांगलीच बिथरली आणि गयावया करू लागली. तिथे उभ्या असलेल्या एका दरोडेखोराने तिला शांत राहायला सांगितलं. तरीही ती ऐकत नाही असं म्हटल्यानंतर त्याने तिला धाक दाखवण्याऐवजी तिच्या कपाळाचं चुंबन घेतलं आणि तिथून ते दोघंही निघून गेले. हा प्रसंग तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला असून सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या