#विधानसभा2019 जागावाटपाचं ठरलं! प्रत्येकी 125, तर मित्रपक्षांना 38 जागा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

येत्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात विविध पक्षांच्या ‘यात्रा’ सुरू आहेत. अशातच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात निवडणुकीसाठी आघाडी होणार असून जागा वाटपाचा तिढाही सुटला आहे. विधानसभेच्या 288 जागांपैकी 125 जागा काँग्रेस तर 125 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढविणार आहे. तर उर्वरीत 38 जागा मित्रपक्षांना देण्यात येणार आहेत. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषेदेत ही माहिती दिली.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सर्वच पक्ष विविध यात्रांचे आयोजन करून आपले शक्तीप्रदर्शन करत आहे. तसेच निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिवसेनेमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची पक्षप्रवेशासाठी रांगा लागल्या आहेत. याच दरम्यान राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने आघाडीवर शिक्कामोर्तब केले. तसेच जागावाटपाचा 50:50 फॉर्म्यूलाही मान्य करण्यात आला आहे.

prithviraj-chavan

आघाडीची माहिती देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, ‘गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष जर एकत्र लढले असते तर गेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल वेगळा लागला असता. मागची चूक आता न करता दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी अघाडीवर शिक्कामोर्तब केला आहे. दोन्ही पक्ष प्रत्येकी 125 जागा लढवणार आहे. या जागांमधील 5 ते6 जागा अशा आहेत, ज्या राष्ट्रवादीकडे असून काँग्रेस त्या जागांची मागणी करत आहे. तर, 5 ते 6 जागा ज्या काँग्रेसकडे आहेत. त्या जागांची मागणी राष्ट्रवादी करत आहे. त्यामुळे सामंजस्याने या जागांची अदलाबदली करण्यात येईल. त्याच प्रमाणे उर्वरीत 38 जागा मित्र पक्षांना देण्यात येणार आहे.’