विद्या मंदिर लेझीम स्पर्धेत पंधराव्यांदा बक्षीस

शासनाच्या शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई पश्चिम आर (पूर्व) विभाग लेझीम स्पर्धेत विद्या मंदिर, दहिसरच्या लेझीम पथकाने नेत्रदीपक कामगिरी करून पंधराव्यांदा बक्षीस पटकावले.

या पथकामध्ये सोनाली पाटील, सृष्टी पाटील, तानिया आदकरे, मुस्कान सैय्यद, प्राजक्ता जगताप, श्रद्धा चव्हाण, चेतना माळवे, जान्हवी भुवड, दिपाली शिंदे, जागृती कदम, संस्कृती हुगेनौर, साहिल पिंपळकर, लक्ष भरते, वेदांत कदम, जिगनेश भाले, रोहित घरत व वाद्यवृंद यांनी उत्कृष्ट कामगिरी करुन तृतीय क्रमांक पटकावला.

या पथकात 40 लेझिमपटूंचा सहभाग होता. चमूला शाळेचे क्रीडा प्रमुख, लेझीम असोसियशन मुंबईचे अध्यक्ष व लेझीम पंच विठ्ठल सुळे यांच्या हलगीची साथ व मार्गदर्शन लाभल्याने विद्या मंदिरने निर्विवाद वर्चस्व गाजवले. अर्चना नागपुरे, पूनम पवार या शिक्षिकांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले. या सर्वांना शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक सुधीर देसाई यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.