
विजय हजारे करंडक 2025-26 आता अंतिम टप्प्यात आला आहे. जवळपास तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या या स्पर्धेत धावांचा पाऊस आणि गोलंदाजंची धारधार गोलंदाजी पाहायला मिळाली. अखेर सेमी फायनलचे चार संघ निश्चित झाले असून फायनलमध्ये कोण पोहोचणार हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांना अजून काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. परंतू सेमी फायनलच्या धुरळा उडवून देणाऱ्या लढती चाहत्यांची वाट पाहत आहे. पहिली सेमी फायनलची लढत 15 जानेवारी आणि दुसरी सेमीफायनलची लढत 16 जानेवारी रोजी बंगळुरूमध्ये खेळली जाणार आहे.
सोमवारी (12 जानेवारी 2026) पार पडलेल्या क्वार्टर फायनलच्या लढतींमध्ये पंजाब आणि सौराष्ट्र या संघांनी सेमी फायनलमध्ये आपली जागा पक्की केली होती. तर आज (13 जानेवारी 2026) पार पडलेल्या क्वार्टर फायनलच्या लढतींमध्ये विदर्भ आणि पंजाबने आपली सेमी फायनलची जागा पक्की केली आहे. त्यामुळे सेमी फायनलचे चार संघ निश्चित झाले आहेत. सेमी फायनलचा पहिला सामना 15 जानेवारी रोजी कर्नाटकविरुद्ध विदर्भ यांच्यामध्ये खेळला जाईल. तर दुसरा सेमी फायनल सामना 16 जानेवारी रोजी सौराष्ट्रविरुद्ध पंजाब या संघांमध्ये खेळला जाईल. तर विजय हजारे ट्रॉफी उंचावण्यासाठीची अंतिम लढत बंगळुरूमध्येच 18 जानेवारी रोजी खेळली जाणार आहे.





























































