चंद्रपूर जिल्ह्यात ‘समस्यामुक्त गाव’ अभियानाची सुरुवात, विजय वडेट्टीवार पोहचले दुर्गम पालेबारसा गावात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

2 ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त चंद्रपूर जिल्ह्यात ‘समस्यामुक्त गाव’ अभियानाची सुरुवात करण्यात आली. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह संपूर्ण प्रशासन दुर्गम पालेबारसा गावात पोहचले. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी व संपूर्ण प्रशासन पालेबारसा या छोट्या गावात पोहोचले.

राज्य शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी प्रशासनाने ही मोठी मोहीम आखली आहे.चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्येक गावात थेट प्रशासन पोचावे यासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. थेट जनतेपर्यंत पोहोचल्याशिवाय योजना व समस्या या दोन्ही समजणार नसल्याचे वक्तव्य पालकमंत्री वडेट्टीवार यांनी केले. कार्यक्रमात राज्य शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना थेट मदत देण्यात आली. मुसळधार पाऊस व अनंत अडचणींचा सामना करत चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने शुभारंभ कार्यक्रम यशस्वी केला.