विक्रोळीत एकहाती भगवाच

1084

विक्रोळी विधानसभा मतदारसंघात यावेळी एकतर्फीच लढत होणार आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या सुनील राऊत यांनी मनसेच्या मंगेश सांगळे यांचा पराभव केला. त्यानंतर गेल्या पाच वर्षांत या मतदारसंघात राऊत यांनी विकासकामांच्या जोरावर आपला दबदबा निर्माण केला आहे. त्यामुळे यावेळी त्यांचाच विजय निश्चित मानला जात आहे. 2004 आणि 2009 वगळता हा मतदारसंघ म्हणजे शिवसेनेचाच गड राहिला आहे. 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेने पुन्हा हा गड खेचून आणला.

या विधानसभा निवडणुकीतील परिस्थिती

2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे विद्यमान आमदार सुनील राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी नगरसेवक धनंजय पिसाळ, वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे आणि मनसेचे विभागप्रमुख विनोद शिंदे रिंगणात आहेत. या मतदारसंघातील मराठी मतदारांची ताकद शिवसेनेच्या पाठीशी आहे. राष्ट्रवादीचे माजी खासदार संजय पाटील यांची ताकद विक्रोळी मतदारसंघात आहे, आता त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शिवसेनेची ताकद अधिकच वाढली आहे. सध्या तरी शिवसेनेच्याच विकासकामांचा जोर या मतदारसंघात असून शिवसेनेपुढे तगडे आव्हान दिसत नाही. त्यामुळे येथे एकतर्फीच निवडणूक होईल असे चित्र आहे.

विक्रोळीत एकूण 2,27,000 मतदार आहेत. यात पुरुष मतदार 53 टक्के तर महिला मतदारांची संख्या 47 टक्के इतकी आहे.

2014 साली झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे सुनील राऊत हे 50,302 मतांसह पहिल्या क्रमांकावर, मनसेचे मंगेश सांगळे हे 24,963 मतांसह दुसऱया क्रमांकावर, राष्ट्रवादीचे संजय दीना पाटील हे तिसऱया तर काँग्रेसचे संदेश म्हात्रे हे 18 हजार 46 मते घेऊन चौथ्या क्रमांकावर फेकले गेले होते.

असा आहे मतदारसंघ

विक्रोळीतील बराचसा भाग इमारती आणि चाळींनी व्यापला आहे. मराठी भाषिकांची लोकसंख्या मोठी आहे. 1984 ते 2009 या काळात कामराज नगर, रमाबाई नगर, गोदरेज गाव, कन्नमवार नगर, टागोर नगर, हरियाली व्हिलेज, कांजूर पूर्व, भांडुप पूर्व हे 8 वॉर्ड या मतदारसंघात येत होते. आता भांडुप पूर्व, कांजूर पूर्व, कन्नमवार नगर, टागोर नगर, हरियाली व्हिलेज, सूर्यानगर हे सहा वॉर्ड किंवा प्रभाग या मतदारसंघात समाविष्ट करण्यात आले आहेत. या सहा वॉर्डांत सध्या काँग्रेसचा 1, भाजपचे 2 आणि शिवसेनेचे 3 नगरसेवक आहेत.

शिवसेनेची विकासकामे

  • कन्नमवार नगर येथील संक्रमण शिबिरातील रहिवाशांचा 40 वर्षांपासूनचा प्रलंबित पात्र-अपात्र हा विषय मार्गी लावला. या रहिवाशांना हक्काची घरे मिळवून दिली.
  • कन्नमवार नगर-टागोर नगर या म्हाडा वसाहतीमधील वाढीव 300 टक्के सेवा शुल्क आणि त्यावरील व्याज माफ केले. येथील मलनिःसारण आणि पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिनीसाठी 150 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला.
  • कन्नमवार नगर येथील अनेक वर्षांपासून प्रलंबित जलतरण तलावासाठी 5 कोटी 30 लाख 21 हजार 500 रुपयांचा निधी मंजूर करून निविदाही काढल्या. लवकरच कामाला सुरुवात.
  • भांडुप (पूर्व) ते भांडुप पश्चिम उड्डाणपूल मंजूर करून घेतला. लवकरच कामाला सुरुवात. वीर सावरकर मार्ग, एम. डी. केणी मार्ग आणि उदयश्री मार्ग रस्त्याचे रुंदीकरण केले.
  • सूर्यानगर येथे 22 कोटी रुपये खर्चून संरक्षक भिंती बांधल्या.
  • कन्नमवार नगर येथे क्रांतिवीर महात्मा जोतिबा फुले 11 मजली सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर करून घेतले.
  • अनेक एसआरए आणि म्हाडा पुनर्विकासाचे रखडलेले प्रकल्प मार्गी लावले.
  • टागोरनगरमधील इमारत क्रमांक 18 जवळील स्वामिनारायण उद्यानाचे सुशोभीकरण केले. अनेक सोसायटय़ा आणि चाळींमध्ये पेव्हर ब्लॉक तसेच लादीकरणाचे काम केले.
आपली प्रतिक्रिया द्या