
‘विक्रांत वाचवा’च्या नावाखाली लोकांकडून कोटय़वधींचा निधी गोळा करून त्या रकमेचा अपहार केल्या प्रकरणातील आरोपी किरीट सोमय्यांची आज आर्थिक गुन्हे शाखेत तीन तास कसून चौकशी करण्यात आली. तपास अधिकाऱयाने कोटय़वधी रकमेच्या अपहारासंबंधी प्रश्न विचारून सोमय्यांचा जबाब नोंदवून घेतला.
या प्रकरणात सोमय्यांना सोमवार ते गुरुवार असे चार दिवस सकाळी 11 ते दुपारी दोन या वेळेत तपास पथकासमोर हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. त्यानुसार सोमय्या आज सकाळी 11 वाजता तपास पथकासमोर हजर झाले. उद्या मंगळवारी पुन्हा सोमय्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर राहणार आहेत.



























































