
विलेपार्ले येथे घरफोडी करणाऱया सराईत चोरटय़ाला जुहू पोलिसांनी अटक केली. शंकर ऊर्फ उम्या देवेंद्र असे त्याचे नाव असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे.
विलेपार्ले परिसरात महिला राहते. ऑगस्ट महिन्यात महिलेला गावी जायचे होते. तिने घरात सर्व दागिने, पैसे, कपडे असे साहित्य ठेवले होते. पहाटे महिला उठल्यावर साहित्य जागेवर नव्हते. घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरीप्रकरणी महिलेने जुहू पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांना परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केली. फुटेजवरून पोलिसांनी शंकरला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर शंकरने गुह्याची कबुली दिली. शंकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात जुहू, खार आणि अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
































































