सातारा जिल्ह्यातील  ग्रामपंचायतींकडे कररुपाने कोटय़वधी रुपये जमा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सातारा जिल्ह्यातील  नगरपालिकांना शहरी भागातील कर जमा करण्यासाठी विविध क्लुप्त्या लढवाव्या लागतात. पण, ग्रामीण भागातील अन्नदाता ग्रामपंचायतींचा कर वेळेत भरतो. त्यामुळे ग्रामपंचायतीही मालामाल होऊन त्यातून विकासकामे होतात. यंदाही जिह्यात मार्चअखेर ग्रामपंचायतींकडे कोटय़वधी रुपये कररुपाने जमा झाले आहेत.

ग्रामीण भागात ग्रामपंचायतींच्या माध्यमातून विविध सुविधा पुरवण्यात येतात. या ग्रामपंचायतींना शासनाकडून विकासकामांसाठी निधी मिळतो. तसेच काही रक्कम ही कररूपाने जमा करावी लागते. हा कर एप्रिल ते मार्च अशा आर्थिक वर्षात आकारला जातो. हे आर्थिक वर्ष मार्चला संपते. त्यापूर्की दोन महिने अगोदर म्हणजे फेब्रुवारीपासूनच ग्रामपंचायती थकीत तसेच चालू वर्षाचा कर 100 टक्के जमा व्हावा म्हणून प्रयत्नशील असतात. त्यामुळे मार्च महिन्याअखेर 90 टक्क्यांवर कर जमा होत असतो. या भरणाऱयांमध्ये प्रामुख्याने शेतकऱयांचाच समावेश असतो. जगाचा पोशिंदा असणारा अन्नदाता शेतकरी घर आणि पाणीपट्टीचा कर वेळेत भरण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतो.

जिल्ह्यात 1492 ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींना घरपट्टीचा 2021-22 मधील कर 82 कोटी 31 लाख 18 हजारांचा येणार आहे. तर मार्च 2021 अखेरची थकबाकी 8 कोटी 1 लाख 85 हजार होती. त्यामुळे मार्चअखेर एकूण 90 कोटी 33 लाख 3 हजार कसूल करायचे होते. फेब्रुकारीअखेर त्यातील 67 कोटी 83 लाख 69 हजार कसूल झाले. टक्केकारीत हे प्रमाण 75.10 टक्के होते. जिह्यातील ग्रामपंचायती पाणीपट्टीही वसूल करतात. मार्चअखेरीस पाणीपट्टी रक्कम 36 कोटी 54 लाख 82 हजार, तर थकबाकीची रक्कम 3 कोटी 60 लाख 12 हजार होती. पाणीपट्टी 40 कोटी 14 लाख 94 हजार कसूल करण्यात येणार होती. फेब्रुकारीअखेर 30 कोटी 41 लाखांची पाणीपट्टी वसूल झाली. त्याचे प्रमाण 75.75 टक्के इतके होते. मार्चअखेरचा विचार करता त्यामध्ये वाढ झालेली आहे.