रत्नागिरी-सिंधुदुर्गात विनायक राऊतांविरोधात विनायक राऊत लढणार निवडणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । रत्नागिरी

रायगड लोकसभा मतदारसंघात सुनील तटकरे आणि अनंत गीते यांच्या नावाच्याच इतर उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्गातही तसाच प्रकार घडला आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊतांविरोधात विनायक राऊत या अपक्ष उमेदवाराने अर्ज भरला आहे. मात्र या अपक्ष उमेदवाराचे पूर्ण नाव विनायक लऊ राऊत आहे.

मुख्य उमेदवाराच्या नावाचे साधर्म्य असलेले उमेदवार निवडणूक रिंगणात उभे केले जातात.रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी अर्ज भरला आहे. आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजापूर तालुक्यातील विनायक लवू राऊत या अपक्ष उमेदवाराने अर्ज भरला आहे.