खासदार विनायक राऊत यांची पूरग्रस्त संगमेश्वरला भेट

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या संगमेश्वर बाजारपेठ परिसराला खासदार विनायक राऊत यांनी भेट देत नुकसानीची पहाणी केली. सलग पडणाऱ्या पावसामुळे संगमेश्वर बाजारपेठ व रामपेठमधील दुकानांचे व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बाजारपेठेत असलेला चिखल काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. खासदार विनायक राऊत यांनी पूरग्रस्त संगमेश्वरची पहाणी केली. यावेळी आमदार राजन साळवी , शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाहिक सभापती जयसिंग माने, सुभाष बने , वेदा फडके आदी यावेळी उपस्थित होते.

खासदार विनायक राऊत यांनी संगमेश्वरमधील17 नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांची यादी मागवून घेतली आहे. यावेळी संगमेश्वर व्यापारी संघाचे अध्यक्ष शंकर भिंगार्डे यांनी खासदार राऊत यांच्याकडे निवेदन सादर केले. या निवेदनाद्वारे संगमेश्वरमधील पूरस्थितीतून नागरिकांना बाहेर पडण्यासाठी मारूतीमंदिर ते गणेश कृपा हॉटेलपर्यंतचा गाळ उपसा करणे तसेच तलाठी पंच यादीमध्ये घरपट्टी तसेच असेसमेंट उताऱ्याची अट कमी करणे , 2 टक्के व्याजाने बँक कर्ज मिळणेसह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी व्यापारी संघाचे उपाध्यक्ष सुशांत कोळवणकर , संदिप रहाटे , अनिल भिडे, अभय गर्दे , मनोहर गीते , संजय कदम , संजय खातू आदि उपस्थित होते. तसेच तलाठी व विविध प्रशासकीय अधिकारीही उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या